बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

मुंबई | कोरोना (Corona) काळानंतर शेअर बाजारात मोठा मोठी वाढ झालेली पहायला मिळाली. गेल्या महिन्यात शेअर बाजार सर्वकालिन उंचीवर होता. मात्र, आता जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट होत असल्यानं शेअर बाजार पुन्हा घसरणीचा रस्ता पकडताना दिसतोय. अशातच आता शेअर बाजारचे बिग बुल (Big bull) म्हटले जाणारे गुंतवणूकदार झुनझुनवाला यांना मोठा धक्का बसला आहे. (Jhunjhunwala loss a total of Rs 153 crore)

अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सर्व गुंतवणूकदारांचे मिळून जवळपास 16 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशातच टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीही मोठी घट झाली आहे.

प्रतिशेअर 174 रुपये म्हणजेच जवळपास 7 टक्क्यांनी आठवडाभरात घसरण झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची भागेदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे साधारणपणे साडेचार टक्के शेअर आहेत.

दरम्यान, झुनझुनवालांना एकूण 153 कोटींचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटने म्हणजेच ओमिक्राॅनने (Omicran) जगभर थैमान घातल्याचं दिसतंय. त्यामुळे आता जागतिक बाजाराचा मोठा परिणाम भारतीय बाजारावर होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

आणीबाणी जाहीर! ‘या’ शहरात कोरोनाने माजवला हाहाकार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने राज्यात खळबळ; बीएमसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! अहमदनगर येथे एसटी बसेसवर दगडफेक

“सरकार पडणार असं बोललं जात आहे, पण चाललंय ना बाबा सरकार”

“…यासाठी सत्ताधारी सेनेला किती दंड आकारायचा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More