बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही”

मुंबई | राज्यसभेच्या (rajyasabha)सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणुका पार पडल्या. यादरम्यान भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे.

भाजपच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे. मी बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान विधान भवनात आलो. मी मतदान करायला गेलो. त्यानंतर मतदान करून बाहेर आलो. मी मतदानाची जी क्रिया केली त्यातून काही झाली आणि मत बाद व्हावं असं काही झालं असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.

नियमाप्रमाणे मी मतदान केलं असून माझ्या पक्षातील लोकांनाच मत दाखवल्यांचं कबूल केलं. असं न केल्यास मला पक्षातून निंलबित केल असतं. सहा वर्षासाठी माझं राजकीय अस्तित्व नष्ट झालं असतं. मत बाद होणारी कोणतीही कृती मी केली नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात बदल्याचं राजकारण(politics) सुरू आहे. आम्हाला चुकीच ठरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि जे काही सुरू आहे ते वेदनादायक आहे, अशी खंत आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली

दरम्यान निवडणूक आयोगाकडून आव्हाडानां क्लिन चिट मिळाली आहे. राज्यसभा निवचणुकीतील त्यांच मत ग्राह्य धरण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं”

पुढील दोन दिवसांमध्ये ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

I Love Congress म्हणत ‘या’ आमदाराने केलं क्रॉस व्होटिंग!

Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, भाजप आमदाराचं काँग्रेसला मतदान

President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More