बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जितेंद्र आव्हाडांकडून जनतेला गॅस सिलेंडर दरवाढीच्या आगावू शुभेच्छा!

मुंबई | वाढत्या महागाईवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. कोरोनामुळे काहींना रोजगार नाही आणि आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सर्वसामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना गॅसच्या दराचे भाव वाढल्यामुळे जनता त्रासली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्राला उपरोधिक टोला हाणला आहे.

सिलेंडर 940 रुपयांना झाला आहे. आता सिलेंडरचा दर लवकरच हजार रुपयांच्या घरात असेल. सर्वांना सिलेंडर दराच्या हजारीच्या आगावू शुभेच्छा.., असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. याबाबत आव्हाडांनी फेसबुक पोस्ट केली आहे. आव्हाडांअगोदर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपये आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 75 रूपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मन:पुर्वक आभार, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विना सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये या 15 दिवसांमध्ये तब्बल 50 रूपयांची गॅस दरवाढ झाली. याआधी 18 ऑगस्ट ला पेट्रोलियम कंपन्यांनी 25 रुपयांची दरवाढ केली होती. ‘महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी, असंही रूपाली चाकणकर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“काॅंग्रेसच्या मनात मोठ मोठ्या संकल्पना पण…”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या घरातील ‘या’ सदस्याचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

तालिबान्यांच्या मनात काय!! अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या ‘या’ महत्त्वाच्या सेेवाही केल्या बंद

“भारताने 20 वर्ष शत्रूला मदत केली त्यामुळे…”; अडकलेल्या भारतीयांबाबत तालिबानचं मोठं वक्तव्य!

“राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More