ठाणे | कळवा मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मात्र या रॅलीला एवढा उशीर झाला की आव्हाडांना आपला उमेदवारी अर्जच भरता आला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सरकारी कार्यालय बंद झालं होतं.
आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. शरद पवारांच्या उपस्थितीमुळे आव्हाडांना गहिवरून देखील आलं.
रॅलीनंतर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. शरद पवार उन्हातान्हात रॅलीत सहभागी झाल्याचा क्षण मोठा असल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.
दरम्यान, पवारांना त्रास दिलेल्यांना धडा शिकवणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद अडकल्या शिवबंधनात; मतदारसंघही ठरला! https://t.co/4yrEysCRCY @deepalisayed @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याची पक्ष सोडून जाण्याची धमकी!- https://t.co/tUaxOt8bqn #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात लढणार पूर्वी भाजपमध्ये असणारा पण आताचा काँग्रेस नेता!https://t.co/JQT8v6Y0le @AshishRDeshmukh @Dev_Fadnavis #विधानसभा
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.