Top News महाराष्ट्र मुंबई

“आपलेच आपले सोडून जाऊ नये यासाठी किती ओरडावं लागतं ना…”

मुंबई  |  महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्थिर आहे, अशा चर्चा सध्या रंगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. या चर्चांवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला हाणला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार तसंच प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा राज्यातील ठाकरे सरकारच्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले. त्यावर मंगळवारी दिवसभर राजकीय खुलासे आणि आरोप झाले. दरम्यान, या चर्चांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला चिमटे काढत टीका केली आहे.

पडणार, पडणार, पडणार… झाडावरून पिकलेले आंबे, सीजन आहे ना!!! आपलेच आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते, पडणार… पडणार… पडणार, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे  भाजपने कितीही राजकारण केलं तरी ठाकरे सरकार स्थिर आहे आणि स्थिर राहिल. आमचं सरकार व्यवस्थितपणे पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 140 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी, वाचा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पलटवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या