मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी धार्मिक स्थळांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. तर ‘महाराष्ट्रात कुणीच योगी नाही, आहेत ते सत्तेचे भोगी’, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली होती. ‘ए भोगी कुछ तो सीख हमारे भोगी से’, असा अमृता फडणवीसांनी लगावला होता. यावर आता राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कोणी मानसिक रोगी, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी मोजक्या शब्दात ट्विट करत सोबत एक GIF देखील शेअर केलं आहे.
दरम्यान, योगी आणि भोगी शब्द वापरत राज ठाकरे व अमृता फडणवीस दोघांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी हा टोला नेमका कोणाला लगावला आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोणी योगी आहे
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! पुणेकरांना झटका, सीएनजीचे दर तिसऱ्यांदा महागले
रशिया-युक्रेन युद्धाचा तळीरामांना असाही फटका, महत्त्वाची माहिती समोर
“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”
मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल
काहिली वाढणार काळजी घ्या! IMD कडून ‘या’ पाच राज्यांना अलर्ट जारी
Comments are closed.