बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पदभार स्विकारताच एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश ठरणार आहे.

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीच पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयाकडून आता नियुक्त करण्यात येत असल्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे हे येत्या 23 एप्रिलला निवृत्त होणार असून त्यांनी पुढच्या सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन व्ही रामन्ना यांचं नाव सुचवलं होतं. एन. व्ही. रामन्ना यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला.

एन. व्ही. रामन्ना हे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणून 26 ऑगस्ट 2022 पर्यंत काम पाहणार आहेत. जवळपास चार दशकांच्या न्यायव्यवस्थेच्या कार्यकाळात एन. व्ही. रामन्ना यांनी आंध्र प्रदेश, केंद्र आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण उच्च न्यायालयाबरोबर इतरही महत्त्वाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी बजावली आहे.

थोडक्यात बातम्या

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More