अखेर आठवड्यानंतर कमला मिल आगीप्रकरणी पहिली अटक

मुंबई | कमला मिल आगीप्रकरणी पहिली अटक करण्यात आलीय. युग पाठक असं या आरोपीचं नाव आहे. तो पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे. 

युग मोजो ब्रिस्टो पबचा मालक आहे. त्याच्यासोबत डुक थुली, प्रितीना श्रेष्ठी आणि सौमित्र श्रृंगारपूरे हेदेखील पबचे मालक आहे. अग्नीशमन दलाने मोजोमध्येच आग लागल्याचं स्पष्ट केल्यानं आता मोजोच्या मालकांच्या अडचणींमध्ये वाढ झालीय. 

कमला मिलमध्ये लागलेल्या या आगीत 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढतोय.