बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे कमाल आर. खान. केआरके कोणावरही निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. यातच आता अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरुन केआरकेनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अनेकजण पलायन करताना दिसत आहे. यातच मुस्लीमांसाठी भारत हा सर्वात सुरक्षित देश असल्यांच केआरकेनं ट्विटमधून म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या परस्थितीवर ट्विट करत केआरकेनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

केआरकेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी माझ्या मुलांना म्हटलं आहे की, जगात कुठेही जा, कुठेही रहा मात्र आपली राष्ट्रीयता बदलू नका. कारण भारत हा सर्वश्रेष्ठ देश आहे. काही भारतीय मुसलमानांचा असा विचार आहे की, भारत त्यांच्यासाठी ठीक नाहीये. याचं फक्त एकच कारण आहे त्यांनी आपल्या जीवनात दुसऱ्या कोणत्यास मुस्लीम देशाला पाहिलं नाही.

दरम्यान, केआरके बाॅलिवूडमध्ये जास्त काही करु शकला नाही. मात्र तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेला पाहायला मिळत असतो. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो निशाण्यावर असलेला पाहायला मिळतो. बाॅलिवूडवर निशाणा साधताना तो नेहमीच पाहायला मिळतो.

 

 

थोडक्यात बातम्या – 

“आम्ही महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहोत, त्यांचा गुलाम नाही”

“पोरगं हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का?”

‘दोन आठवड्यात शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा’; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला ताकीद

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More