बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन

अहमदनगर | प्रसिद्ध कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी त्यांचं निधन झालं.

2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील. कांताबाईंनी मुंबईला जाऊन हनुमान थिएटरमध्ये तुकाराम खेडकर यांच्या फडात सहभागी झाल्या. त्यानंतर  रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा अशा अनेक धार्मिक, पौराणिक, रजवाडी, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

दरम्यान,  कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकीक होता.

थोडक्यात बातम्या- 

अल्पवयीन मुलाला महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मारहाण, पाहा व्हिडीओ

अचानक फ्लाईटमध्ये कपलने सुरू केलंं किसिंग त्यानंतर एअरहोस्टेसने केलं असं काही की….

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाच निरोप

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More