बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

मुंबई | एकता कपूरची प्रसिद्ध आणि घराघरात पोहोचलेली सिरीअल कसौटी जिंदगी कीमध्ये काम केलेल्या प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वांना मोठ्ठा धक्का बसला आहे.

तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी प्राचीनवर मालाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन प्राचीन विरोधात 345,342,323,502 (2) कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राचीननं ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर त्यानं ‘,कुछ झुकी पलकें, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे आणि माता पिता के चरणों में स्वर्ग, यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी नागिन फेम पर्ल वी पूरी याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती. प्राचीन हा देखील पर्ल पुरीप्रमाणेच एकता कपूर प्रोडक्शनशी जोडलेला होता. अटकेप्रकरणी प्राचीननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

“15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं पण आता…”

“अण्णा हजारे 7 वर्षांच्या कुंभकर्णीय झोपेतून खडबडून जागे झालेत”

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

सैराट फ्रेम तानाजीनं केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर तुफान चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More