बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरविंद केजरीवाल पंजाबमधील महिलांना दरमहा देणार 1000 रुपये

नवी दिल्ली | देशात येत्या काही महिन्यावर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या निवडणुकीच्या तोंडावर पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यावर असताना महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पंजाबमधील महिलांसाठी अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच सरकार आल्यास हे आश्वासन नक्कीच पु्र्ण करू, असा विश्वासही या महिलांना त्यांनी दिला आहे. 18 वर्षांच्यावरच्या सर्व महिलांना दरमहा 1000 रुपये वेतन देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील मोगा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, विरोधकांना वाटेल की केजरीवाल यांच्याकडे एवढे पैसे कुठून येणार, तर पंजाबमधून माफिया नष्ट केल्यानंतर आपोआप सर्व सुरळीत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांनी ऑटो रिक्षामधून प्रवास केला तसेच रिक्षा चालकाच्या घरी जेवणही केलं आहे.

सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना 5 राज्यांच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच यावेळी पंजाबच्या महिलाच ठरवणार की कोणाला मतदान करून निवडून आणायचं, असं म्हणत त्यांनी एकदा संधी देऊन तर बघा, असं आवाहन त्यांनी पंजाबच्या जनतेला केलं आहे.

थोडक्यात बातम्या

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

दिलासादायक! महाराष्ट्रातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या आत

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More