मुंबई | किरण माने प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. याप्रकरणानं राजकीय वळणंही घेतलेलं पहायला मिळालं. याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अचानकपणे काढून टाकल्यानंतर अभिनेते किरण माने चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवलयानं आला. मालिकेतून काढल्यावरुन राजकारण तापल्याचं पहायला मिळालं. अशातच हे प्रकरण ताजं असतानाच आता किरण मानेंना एक गुडन्युज मिळाली आहे.
किरण माने यांचं आता काय होणार हा प्रश्न उद्भवला असतानाच त्यांना एक नवीन चित्रपट मिळाला असल्याचं समोर आलं आहे. रावरंभा या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. याविषयी किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम!
पढे ते म्हणाले की, आपन वास्तवात ज्या विचारधारेची ‘भुमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरही त्याच विचाराचा धागा असणारी ‘भुमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाही भावांनो.
थोडक्यात बातम्या –
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट, डाॅक्टर म्हणाले…
पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार
कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला
बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ
Comments are closed.