बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका

मुंबई | एसआरएमधून फाईल चोरी केल्याप्रकरणी प्रवीण कलमे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केलं आहे. त्यात प्रवीण कलमे देश सोडून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

प्रवीण कलमे प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे. प्रवीण कलमेंना अटक होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन देखील केले होते, असा घणाघात सोमय्यांनी केला.

प्रवीण कलमे म्हणजे उद्धव ठाकरेंचा उजवा हात. कलमे म्हणजे अनिल परबांचा चाहता आणि जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंनी कलमेंच्या तक्रारीविरोधात सहा वेगवेगळे आदेश काढले पण लुक आऊट नोटीस निघालीच. शेवटी अंत जवळ आला आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, प्रवीण कलमे देश सोडून दुबईला गेले असल्याचं म्हटलं जात आहे. यावर देखील सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबईत लपलेल्या प्रवीण कलमेंना मुंबई पोलिसांना दुबईहून पकडून कोर्टात दाखल करावच लागेल, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर

“चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचा गाल लाल करणार होतात, आता वचन नक्की पाळा”

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर!

मोठी बातमी! संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More