‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या

नवी दिल्ली | भाजपनेते किरीट सोमय्या ब्लॅकमेलर असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांना किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. विषय चर्चेत यावा यासाठी संजय राऊतांनी मुद्दाम त्या बंगल्यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि मी ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केला जात आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या आरोपांनंतर मी ब्लॅकमेलर असल्याचं सोमय्यांनी ठणकावून सांगितलं. ‘महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी लढणं याला जर कोणी ब्लॅकमेलर म्हणत असेल तर हो मी ब्लॅकमेलर आहे’, असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं आहे.
दरम्यान, पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाचा संबंध आहे का?, या प्रश्नावर सोमय्यांनी मौन कायम ठेवलं. तर मी एक दमडीचीही चूक केलेली नाही, चूक वाटत असेल तर ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी, असं आवाहनही सोमय्यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”
‘बाप बेटे जेल मधे जाणार’, संजय राऊतांचं सूचक ट्विट
Lassa Fever | ओमिक्रॉननंतर लासा फिवरची दहशत, ‘या’ व्यक्तींना आहे सर्वात जास्त धोका
डिस्को किंग काळाच्या पडद्याआड, सुप्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं निधन
प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा भीषण अपघातात मृत्यू
Comments are closed.