नाशिक | तथाकथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यासह युवा नेते रोहित पवार यांचंही नाव आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांचं नाव आहेच पण त्याच प्रकरणात एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेमध्ये संचालक असलेल्या रोहित पवार यांचं नाव आहे. नाबार्ड, कॅग आणि रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ही माहिती आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
राज्य सरकारने या संपूर्ण घोटाळ्याबाबत एक समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखानाच्या खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित यांचं नाव आहे, असं सोमय्या म्हणाले.
ईडीच्या अहवालात शरद पवार यांचं नाव आल्याने दुख: झाल्याचं कारण सांगत अजित पवार यांनी राजीनामा दिला. मात्र खरं राजीनामानाट्य चौकशी झाल्यानंतच समोर येईल, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
“विरोधकांनी मला निवडणूक खर्च देण्याची ऑफर दिली पण मी त्याला बळी पडलो नाही” https://t.co/2aZ9BpUz6Y #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
महेश लांडगेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा; पंकजा मुंडे यांचे आवाहन https://t.co/FLsw1Cs1ag @MLAMaheshLandge @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
“महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास” – https://t.co/ieagA7EHtw @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
Comments are closed.