Top News महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

मुंबई | ठाकरे सरकारमधील मंत्री संपत्ती लपवतात तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे संतती आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे अनधिकृत बांधकामात व्यस्त असल्याची टीका भाजप नेते आणि माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी भाजपने आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विहंग गार्डन इमारत प्रकरणी त्यांच्याकडून 11 कोटी दंड आहे तो वसूल करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी टीका करताना मुंडेंनाही टोला लगावला.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे सरकामधील मंत्री काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!

“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या