बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले

मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोंडीवर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीही त्यांचं परखड मत व्यक्त केलं आहे.

खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आले. मात्र, त्यांनी तुम्हाला विचारलं का? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी उपस्थित केला आहे. तर तीन दिवस झाले राज्यात कोणालाच सुधरत नाही, असा टोलाही इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.

तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि असेच मरा, असं मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत इंदुरीकर महाराजांनी सामान्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तानाट्यावर अनेक मीम्स आणि जोक पाहायला मिळत आहेत. इंदुरीकर महाराजांनीही त्यांच्या खास शैलीत राज्यातील सध्य परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया

‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर

‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More