बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मिळणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या LPG कंपनीनं आणलेला नवा नियम

नवी दिल्ली | इंण्डेन कंपनीचा घरगुती गॅस असणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांसाठी असलेल्या एका खास सुविधेची ट्वीट करून माहिती दिली आहे. ग्राहकांसाठी असलेल्या डीएसी नंबर आणि त्याच्या फायद्याबाबत इंडियन ऑइलने ट्विट करून सांगितलं आहे.

इंण्डेन हा गॅस भरण्यासाठी बुक करताना नेहमी एक युनिक कोड जनरेट होणार आहे , त्यालाच डीएसी असे म्हणतात. सिलेंडर ग्राहकाच्या घरी डिलिव्हर करण्यात येतो त्यावेळी डिलिव्हरी करतेवेळी डिलिव्हरी बॉयला हा कोड ग्राहकांनी द्यायचा आहे.

एक प्रकारे ओटीपी प्रमाणेच हा डीएसी कोड काम करतो. जर ग्राहकांकडे हा कोड नसेल तर त्यांना परिणामी गॅस सिलेंडर मिळणार नाही. ज्यावेळी डिलिव्हरी बॉय गॅस घेऊन घरी येईल, तेव्हा त्याला ओटीपी दिल्यानंतरच तुमची डिलिव्हरी पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही.

इंण्डेनच्या सर्व ग्राहकांना अशा प्रकारचा कोड एसएमएस द्वारे पाठवला जाणार असून  घरी सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरी वेळी हा कोड सांगून गॅस स्वीकारायचा आहे.

थोडक्यात बातम्या

“जड्डुला प्रसिद्धी नको आहे, तो शांतपणे सर्वांना मदत करतो”

…अन्यथा कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांवरच दाखल होणार गुन्हे, ‘या’ शहरात नवा नियम

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाआधी नवरदेव कोरोना पाॅझिटिव्ह; चक्क पीपीई घालून उरकलं लग्न

“सरकारवर खापर फोडण्याआधी स्वत: शिस्त पाळा”; बेशिस्त नागरीकांना औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More