Top News आरोग्य सातारा

कोमलचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी- उदयनराजे भोसले

सातारा | न्यू लाईफ फाऊंडेशनच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या कोमल पवार-गोडसे यांचं निधन झालं आहे. कोमल यांच्या निधनाने संपूर्ण सातारा हळहळं आहे. कोमलवर तीन वर्षांपूर्वी हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आलं होतं भाजपचे खासदार उदयराजे भोसले यांनी देखील सोशल मिडीयावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

उदयनराजे भोसले त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात, सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. ३ दिवसांपूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.”

उदयनराजे पुढे म्हणाले, सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हिला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ति मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती कोमल ठरली होती.”

“कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली.” असंही उदयनराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

“पुण्यात पत्रकाराचा खून?, कोविड सेंटरचं उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पांडुरंगला श्रद्धांजली”

‘पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाला’; अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे- देवेंद्र फडणवीस

“माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या