कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षेची सुनावणी

अहमदनगर | राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तिन्ही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आलेत. येत्या 22 नोव्हेंबरला याप्रकरणी शिक्षेची सुनावणी होणार आहे. 

आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत. त्यामुळे या तिन्ही नराधमांना फाशी की जन्मठेपेची शिक्षा होणार हे आता 21 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते. तसेच तिन्ही आरोपींनाही न्यायालयात आणण्यात आलं होतं.