Top News महाराष्ट्र मुंबई

‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…

मुंबई | शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी काल शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची गाझीपूर सीमेवर जाऊन भेट घेतली. संजय राऊत आणि टिकैत यांच्या भेटीवर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मिश्किल भाष्य केलं आहे.

कुणाल कामराने संजय राऊत आणि सतीश टिकैत यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यासोबच या फोटोंमध्ये त्याने खालील बाजूला राऊतांच्या फोटोखाली जेसीबी आणि टिकैत यांच्या फोटोखाली ट्रॅक्टरचे फोटो जोडले आहेत.

कुणालने दोघांचे फोटो पोस्ट करत, ‘मिले सुर तुम्हारा’ असं शीर्षक दिलं आहे. कुणाल कामरने  याआधी संजय राऊतांची ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मुलाखत घेतली होती. मुलाखतीत कुणालने टेबलवर जेसीबी ठेवलेले पाहायला मिळाले होते.

दरम्यान, कुणालने त्यावेळी मुलाखतीनंतर राऊतांना जेसीबी भेट म्हणून दिला होता. खरोखुरा नाही तर लहानसा जेसीबी. याच पार्श्वभूमीवर कुणालने दोघांच्या भेटीला ट्रॅक्टर आणि जेसीबीची उपमा दिली असावी.

 

थोडक्यात बातम्या-

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार

कोरोनानंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार- आदित्य ठाकरे

“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”

“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या