मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा आहे. पूजा चव्हाणचे मंत्रिमंडळातील एका मंत्र्यासोबत संबंध होते अशा उलटसुलट चर्चांणा उधाण आलं आहे. पूजाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत संभ्रम आहे. अशातच पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे.
पूजाने 25 ते 30 लाखांचं कर्ज काढलं होतं. तिने पोल्ट्री व्यवसायासाठी हे कर्ज काढलं होतं. बांधकाम झालं आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू होताच कोरोना आला. त्यामुळे आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या होत्या तेव्हा आमचं 1 रूपयाही न मिळता 25 लाखांचं नुकसान झालं होतं. या नुकसानीमुळं पूजा काहीशी ताणात होती आणि तिच्यावर मानसिक उपचारही सुरू होते, असं लहू चव्हाण यांनी सांगितलं.
आमचा कोणावरही संशय नाही. संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका. पूजाचे कोणासोबतही संबंध नाही. कुटुंबावर कोणाचाही दबाव नसल्याचंही लहू चव्हाण म्हणाले. मात्र सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी टीका केली. पूजाच्या आत्महत्येला राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांमागे पूजाची बहिण दिया चव्हाणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, असं दिया चव्हाणने म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”
शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…
पूजा चव्हाणच्या कुटुंबाला आम्ही भेटू शकत नाही, कारण…- नीलम गोऱ्हे
‘न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणं म्हणजे…’; रंजन गोगोई यांचं धक्कादायक वक्तव्य
‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रमक