बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानं बदलला वकिलांचा ड्रेस कोड; पाहा आता काय झालाय बदल…

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येत्या काळात आपल्याला जीवनशैली बदलावी लागेल असा निष्कर्ष काढण्यात येत. त्याची सुरुवात न्यायव्यवस्थेपासून झाली आहे. सुनावणी दरम्यान वकिलांनी पांढरे कपडे घालावेत. तर न्यायाधीश मात्र कोट किंवा गाऊन घालू शकतात, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने काढले आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने वकीलांचा ड्रेसकोड बदलला आहे. पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी, पांढरा नेक बँड अशा ड्रेसकोडची घोषणा करण्यात आली आहे. जोपर्यंत कोरोनाचं संकट आहे, तोपर्यंत होणाऱ्या ‘व्हर्च्युअल कोर्ट’ रुममध्ये अशा वेशभूषेत कोर्ट कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कडक उन्हामध्ये काळा कोट परिधान केल्यामुळे वकिलांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना मार्च ते जून या कालावधीत काळा कोट न वापरण्यास मुभा देण्यात येते. मात्र आता सर्व प्रकारच्या सुनावणीसाठी देखील काळा कोट बंधनकारक करण्यात आलेला नाही.

का घालतात वकिल काळा कोट?

वकिलांच्या काळ्या कोटाचा संबंध ब्रिटिश राजवटीशी येतो. ब्रिटिश काळात जज आणि वकील हे काळा गाऊन घालायचे. काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्‍या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत. देशातील १९६१ च्या ऍडव्होकेट अ‌ॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

सोने जमा करणं ही योजना वाजपेयींनी सुरू केली होती; पृथ्वीबाबांचं टीकाकारांना उत्तर

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांमध्ये आजपर्यंतची सर्वांत मोठी वाढ; पाहा तुमच्या भागात किती…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More