बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळू दे”; पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारताबद्दल संवेदना

नवी दिल्ली | संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडतोय तर काही ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. एकूणच देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या सर्व लढाईमध्ये बळ मिळावे यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटुने ट्विट करत भारताबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारतातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता भारतीयांना धीर देणारं ट्विट केलं आहे. ट्विट करून त्याने भारतीयांबद्दल असलेल्या आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी भारतातील नागरिकांना बळ मिळावं, असंही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारतीयांसाठी सध्या कठीण काळ सुरु असून प्रत्येक जण अवघड परिस्थितीतून जात आहे. भारतीय नागरिकांना या संकटाशी लढण्यासाठी अल्लाहने बळ द्यावं व कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनीही हिम्मत ठेवावी, अशा आशयाचं ट्विट केल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सध्या भारतासाठी कोरोनाचा कठीण काळ सुरु आहे. त्यातच अनेक ठिकाणाहून भारताला मदत मिळत आहे. पाकिस्तानशी वैर असताना देखील शोएब मलिक याने त्याचा न विचार करता माणुसकीच्या नात्याने भारतीयांना जो धीर दिला आहे, तो नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.

थोडक्यात बातम्या –

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

कोरोना लसींच्या किमती कमी करण्याचे सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

फक्त याच ठिकाणी 14 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना जाहीर

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य

नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांकडून अटक, कारण अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More