बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. मराठा आरक्षणावर जाहीर सर्वपक्षीय चर्चासत्र घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून केली आहे.

आरक्षणाचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत आरोप प्रत्यारोपांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय चर्चासत्र प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत जाहीरपणे करावं. खुल्या चर्चेच्या आधारे मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी नक्की काय करावं याचा आराखडा तयार करावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चर्चेचे थेट प्रक्षेपण केले म्हणजे राज्यभरातील असंख्य सर्वसामान्य समाजबांधवांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल व त्यांच्या मनात स्पष्टता निर्माण होईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून सुचवलं. तसेच चर्चेसाठी उपस्थित राहणाऱ्या तज्ज्ञांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, ज्येष्ठ वकील रफिक दादा, डॉ. सर्जेराव निमसे आदी मान्यवरांचा समावेश असावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा समाज मागास आहे याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा प्राप्त होणे हा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा आवश्यक टप्पा आहे. त्यासाठीची प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

बंडातात्या कराडकर यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश; पायी वारीचा निर्णय मागे

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, पुन्हा कडक लॉकडाऊन

‘…तर मला आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा’; छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

अखेर ठरलं! बारावीच्या निकालाचा ‘असा’ असणार फॉर्म्युला, शालेय शिक्षण विभागानं दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More