नागपूर | वातावरणतील होणाऱ्या बदलांमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचही नुकसान होत आहे. यातच आता थंडी कमी होत असून उन्हाची चाहूलही सुरु झाली आहे. आता हवामान खात्यानंही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गुरुवारी शहर आणि विदर्भात परत एकदा हलक्या सरींची हजेरी लागण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. इतकंच नाहीतर शुक्रवारपासून वातावरण पुन्हा एकदा कोरडं होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमानाने गुरुवारी 35 अंशांच्या पुढचा टप्पा गाठला. याच वेळी किमान तापमानात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसानं चिंतेत टाकलं आहे.
थोडक्यात बातम्या –
Nawab Malik Arrested | “ही कायदेशीर आणि राजकीय लढाई आम्ही लढू”
अटकेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले “मला जबरदस्तीने…”
दहावी बारावीच्या परिक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
“मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा…”
“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी”
Comments are closed.