बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलंच! रामदर्शनाला जाताना दोन्ही मुलींना गमावलं दोन वर्षांनी त्याच तारखेला….

हैदराबाद | नियती केव्हा कोणाबर कोणता डाव खेळेल, यावषयी काही सांगता येत नाही. 15 सप्टेंबर 2019 रोजी आंध्र प्रदेश मधील अप्पल राजू आणि अप्पल भाग्यक्ष्मी यांच्यावर नियतीने असाच घात केला. गोदावरी नदीतून भाद्रचलम येथे असलेल्या राम मंदिरात जात असताना बोटीचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही मुलींचं निधन झालं.

यानंतर अप्पल कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरली होती. या दाम्पत्याच्या आयुष्यात संपूर्ण काळोख पसरला होता. मात्र, पुन्हा 15 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ज्या दिवशी त्यांच्या दोन्ही मुलींचं निधन झालं होतं. त्याच दिवशी दोन वर्षांनी पुन्हा जुळे कन्यारत्न प्राप्त झाले.

आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे या दाम्पत्याला पुन्हा आईबाप होण्याचं सुख लाभलं. ज्यादिवशी या दाम्पत्याने सर्वस्व गमवलं त्याच दिवशी त्यांना ते पुन्हा मिळालं. मुलांच्या जन्मानंतर अप्पल कुटुंबीय अत्याआनंदी झाले आहेत. ही देवाची किमया आणि त्याचाच आशीर्वाद असल्याचं अप्पल दाम्पत्याने म्हटलं आहे.

माझी कूस उजवेल असे मला तंत्रज्ञानामुळे वाटत होतं. परंतु जुळ्या मुलांच्या रुपाने माझ्या दोन्ही मुली पुन्हा परत येतील असं मला केव्हाच वाटलं नव्हतं. हा देवाचा आशिर्वाद आहे, अशा शब्दात भाग्यलक्ष्मी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मला सहा तास कोंडून ठेवलं, अन्…’,पत्रकार परिषदेत सोमय्यांचा गंभीर आरोप

झंझावाती खेळी करत ऋतुराज गायकवाडने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

देव तारी त्याला कोण मारी! धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्…

सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपमधील ‘हा’ नेता; मुश्रीफांचा धक्कादायक आरोप

“चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवावा, समोर येऊन लढावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More