Top News देश

“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”

नवी दिल्ली | भाजपसोबत असतो तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं ते सगळं संपलं, अशा शब्दात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी संताप व्यक्त केला आहे.

भाजपसोबत संबंध चांगले ठेवले असते तर. मी 2006-2007मध्ये आणि 12 वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं असल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. मैसूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

2018मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो असल्याचं कुमारस्वामी म्हणाले.

दरम्यान, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यावेळी जनता सेक्युलर दल आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील मतभेदामुळे काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडीत मतभेद निर्माण झाले आणि याचदरम्यान त्यांचे आमदार फुटले आणि सरकार कोसळलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील

भाजपच्या ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश

“दम असेल कर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची झाली तरी द्या”

‘..तर मीपण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार’; विजेंदर सिंगचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

कोहलीने कॅच सोडूनही मॅथ्यू वेड झाला बाद, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या