Top News महाराष्ट्र मुंबई

“राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलणार”

मुंबई | 15 जानेवारी रोजी झालेल्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दावा केला आहे.

ते म्हणाले की, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते. काही ठिकाणी मतमोजणी सुरु आहे त्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करत असून, १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल.”

तसंच, झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षानं साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या असल्याची माहितीही उपाध्ये यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतीला धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या