स्वयंपाकाच्या गॅसची 19वी दरवाढ, गृहिणींचं बजेट कोलमडणार!

दिल्ली | विनाअनुदानित एलपीजीचा दर प्रति सिलिंडर 93 रूपयांनी महागलाय. तर अनुदानित एलपीजी 4.5 रूपयांनी महागलाय. स्वयंपाकाच्या गॅसचे भाव दर महिन्याला वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जुलै 2016मध्ये घेतलाय, त्यानुसार ही दरवाढ करण्यात आलीय.

मुंबईमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी 718 रूपये तर अनुदानित गॅस सिलिंडरसाठी 491.50 रूपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर विमानांसाठी लागणाऱ्या इंधनातही 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.

दरम्यान, गॅस सिलिंडर महागण्याची ही 19वी वेळ आहे. स्वयंपाकातील एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे गृहिणींच्या किचनचे बजेट या महिन्यापासून कोलमडणार असल्याचं चित्र आहे.