सिंधुदुर्ग | रात्रीस खेळ चाले मालिकेतला खलनायक…आण्णा नाईक. आण्णा नाईक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो क्रूर प्रवृत्तीचा गावगुंड. पण पडद्यावर खलनायक व्यक्तिरेखा साकारणारा आण्णा खऱ्या आयुष्यात मात्र हिरो असल्याचं पाहायला मिळालं आहे.
पडद्यावर खलनायकाची भूमिका अत्यंत चोखपणे बजावणारे आण्णा नाईक म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर हे प्रत्यक्ष आयुष्यात हिरोपेक्षा कमी नाही. प्रजासत्ताक दिनी त्यांनी हे दाखवून दिलं. 26 जानेवारीला अभ्यंकरांनी आंबोली येथील सैनिक स्कूलला 1 लाख 1 हजार रूपयांची मदत केली आहे.
अभ्यंकरांनी ही रक्कम एक अनोखी शक्कल लढवून जमा केली आहे. त्यांचे चाहते सेल्फी काढण्यासाठी मालिकेच्या सेटवर गर्दी करायचे. यावर त्यांनी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या नावानं एक ड्राॅप बाॅक्स बनवला आणि सेल्फी काढायचाय तर ड्राॅप बाॅक्समधे पैसे टाका, असं म्हणत त्यांनी रक्कम जमा केली.
वर्षभरात त्यांच्या या ड्राॅप बाॅक्समधे एकूण लाख रूपये जमा झाले आणि ही रक्कम त्यांनी आंबोलीच्या सैनिक स्कूलला भेट दिली. एक अनोखा आदर्श घालून देत माधव अभ्यंकर म्हणजेच आण्णा नाईक यांनी सैनिक स्कूलला देणगी दिली.
ट्रेंडिंग बातम्या –
“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”
महाविकास आघाडीचा साहित्यिकांना दे धक्का; अशासकीय नियुक्त्या रद्द
दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका
महत्वाच्या बातम्या –
निवडणुकी आधी जे भाजपत गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे
“अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही”
देशात CAA, NCR, NPR लागू झालं तर गांधी हरतील आणि जीना जिंकतील- शशी थरूर
Comments are closed.