बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साध्वी प्रज्ञा मूर्ख, आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत”

मुंबई | साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत. आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना मधू चव्हाण यांनी साध्वी प्रज्ञा यांना मूर्ख म्हटलं आहे.

पुण्यातल्या CAA विरोधातल्या सभेत उर्मिला मातोंडकर यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी हिंदूच होता असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मधू चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. गुन्हा करणाऱ्याला धर्म नसतो, असं मधू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

गोडसे खुनी होता त्याने गांधींचा खून केला हेच खरं आहे. तो हिंदू होता की मुसलमान याचा विचार करणं चुकीचं आहे. CAA हा मुसलमान विरोधी कायदा नाही, असंही मधू चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मधू चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपतून त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. पुढे काय होणार हे वक्तव्य त्यांना भोवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

जास्त हाॅर्न वाजवा, जास्त वाट पाहा; मुंबई पोलिसांची भन्नाट युक्ती.. पाहा व्हिडीओ

प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी- सुप्रिया सुळे

महत्वाच्या बातम्या- 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More