यवतमाळ | मॅगी कंपनीच्या टोमॅटो साॅसमध्ये अळ्या आढळल्याचा धक्कादायक आरोप यवतमाळमधील अर्णीच्या तरुणानं केलाय. अमित वानखेडे असं या तरुणाचं नाव आहे.
आपल्या मुलीला सा्ॅस प्रचंड आवडतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात हा साॅस घेतला होता. मात्र आज साॅसमध्ये अळी असल्याचं निदर्शनास आलं. मुदत संपली असावी म्हणून पाहिलं तर एक्सपायरी डेटही एप्रिल 2019ची आहे, असं अमितने फेसबुक पोस्टमध्ये सांगितलंय.
दरम्यान, याप्रकरणी ग्राहक न्यायालयात जाणार असल्याचं अमितनं ‘थोडक्यात’ला सांगितलं. तसेच आपल्या मुलांना असे पदार्थ देताना काळजी घ्या, असं आवाहनही त्याने केलंय.
Comments are closed.