Top News

“मला भाजपवाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलं”

Loading...

पुणे | मला भाजपवाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलेलं आहे. आपला पक्ष छोटा असल्याने त्यांनी असं केल्याचं पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास महाराष्ट्र राज्यमंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. चिंचवडमध्ये आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

शाळेतल्या तफावतीबाबत बोलताना त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या खात्याचं उदाहरण दिलं. यानंतर मात्र त्यांनी आपल्या खात्याचं बजेट वाढवण्यात आल्याचं आवर्जून सांगितलं.

Loading...

जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडे भाजपवाल्यांली टाकून दिलेलं खात दिले, हा कसला पक्ष… आमचा पक्ष छोटा आहे म्हणून तसं केल. पण तुम्ही महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तशं बघू नका. या शाळांवर लक्ष व्यवस्थित दिलं तर उद्याचा दिवस चांगला येईल, असंही जानकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, महादेव जानकर हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते वारंवार त्यांची खंत बोलून दाखवतात. आजही त्याचाच प्रत्यय आला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या