बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांचा नम्रपणा आणि साधेपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल!

मुंबई | सध्या लॉकडाउन असल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. महाराष्ट्रातही इतर राज्यांमधील अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाही समावेश आहे. यासाठी बिहारमधील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर नमस्कार, मी बिहारमधून आरजेडीचा आमदार बोलत आहे. माझ्या शहरातील काही कामगार तुमच्या येथे दोन-तीन ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे अन्नासाठी पैसेही नाहीत, असं सरोज यादव बोलले. यावर उद्धव ठाकरे त्यांनी आपण चिंता करु नका असं सांगत अडकलेल्या कामगारांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहून घेतात जेणेकरुन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल.

महाराष्ट्रात आही 87 हजार लोकांसाठी व्यवस्था केली आहे. तुम्ही काळजी करु नका, आम्ही योग्य ती व्यवस्था करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या हरिवंश चौधऱी यांनी शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचं सांगितलं

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही प्रोटोकॉल मोडून कोणतीही पूर्वसूचना नसताना एका आमदाराशी चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. आज जिथे आमच्या राज्यातील मुख्यमंत्री वारंवार विनंती करुनही बोलण्यास नकार देत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आमच्याशी चर्चा केली, अशी भावना सरोज यादव यांनी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“मरणाच्या उंबरठ्यावर असतानाही डॉक्टर, नर्सेस यांना हसवलं”

या तारखेनंतर राज्यात एकही कोरोनाचा रूग्ण मिळणार नाही; पाहा कुणी केलाय हा दावा

महत्वाच्या बातम्या-

काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय- विराट कोहली

परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More