बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 06 हजार 017 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 13 हजार 051 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 66 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 59,93,401 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढा झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या-

‘प्रसुती वेदना सुरू झाल्यात, बाळाला बघायला नक्की या’; प्राजक्ताची भन्नाट पोस्ट

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

संसार थाटल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच ‘या’ अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?

महिलेच्या अंगावर बसून मारहाण, पोलिसाच्या व्हायरल व्हिडीओनं देशभर संताप

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More