बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्यांवर

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

दिवसभर लाॅकडाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत, परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात फक्त 20,740 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच आज तब्बल 31 हजार 671 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आलं  आहे.  आज 424 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना आज हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या 2 लाख 89 हजार 088 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्यानं, हळुहळु महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लाॅकडाऊनमधुन नागरिकांना सुट देण्यात येऊ शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन 1 जूननंतरही 15 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असल्याचं कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. मात्र, आज दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 573 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा असा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या आत; कोरोनामुक्तीचा दर 94 टक्यांवर

काय सांगता! प्रियंकाच्या या संपुर्ण अवताराची रक्कम ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More