बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचे 5 दिवस महाराष्ट्रातील काही भागांना रेड तर काही भागांना ऑरेंज अलर्ट; वाचा सविस्तर

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाकडून आता ऑरेंज वर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

18 व 19 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने कोकणातील सर्व जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे व सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या 5 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यातच गेल्या काही दिवसात पाऊस दडी मारून बसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली की, आता अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजलेली दिसून येत आहेत. पण पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कलम 144 प्रशासनाकडून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक बाहेर पडल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावं लागू शकतं.

 

 

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More