“अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही; एका राज्यसभेने पुन्हा मुख्यमंत्री बनता येत नाही”
मुंबई | राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपने तीनही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यशस्वी झाले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा पराभव झाला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.
एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही. तसेच एका राज्यसभेने कोल्हापूरची पोटनिवडणूक जिंकता येत नाही.106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही, अशी घणाघाती टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रसेचे इमरान प्रतापगढी यशस्वी झाले आहेत. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने ताकद लावली होती. मात्र, काही अपक्षांची मते भाजपला गेल्याने महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला.
दरम्यान, भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कौतुक केलं आहे. पंरतु, शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. भाजपचा विजय झाला असं मी मानत नाही. निवडणूक आयोगाने त्यांची बाजू घेतली, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
थोडक्यात बातम्या-
वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…
‘…तर एक हजार कोटी देईन’; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
Rajyasabha Election Result | राज्यसभेचा निकाल वाचा एका क्लिकवर
“शरद पवारांमध्ये बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचं टॅलेंट आहे”
Comments are closed.