मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात गदारोळ पाहायला मिळत आहे. राज्यपालांनी शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावरून राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीमधील आमदाराने विधिमंडळाच्या पायऱ्यावर चक्क शिर्षासन केलं आहे.
विधान परिषद आमदार संजय दौड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर खाली डोकं वर पाय करत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. संजय दौड हे बीड येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राज्यपालांनी राज्याचा, राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. मी खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेध केला, असं संजय दौड म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरणार, हे अधिवेशन गाजणार, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यानूसार भाजपने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला घेरलं आहे. तर सत्ताधाऱ्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनंतर राज्यपाल अभिभाषण अर्ध्यावर सोडून निघून गेले.
थोडक्यात बातम्या-
“अटकेत असलेला मंत्री मंत्रिपदावर कसा?, बाळासाहेब असते तर…”
‘नवाब मलिक हाय हाय’, अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधक आक्रमक
मोदी व पुतिन यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा, युक्रेनमधील भारतीयांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर
“भाजप फक्त हूल देतं, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला धक्का
Comments are closed.