बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेंद्रसिंग धोनीचा रेकाॅर्ड मोडणाऱ्या ‘या’ माजी कर्णधाराची निवृत्ती, पाहा भावनिक व्हिडीओ

दुबई | सध्या टी 20 वर्ल्ड कपचे सामने अधिकच रंगतदार होत असलेले पहायला मिळत आहे. अशातच आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणदाहर म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफघाणनं टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान निवृत्ती जाहीर केली. त्याच्या भावनिक निर्णयामुळे त्यालाही अश्रू अनावर झाले.

कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना असगर अफघाणनं नामिबियाविरुद्धची लढत ही शेवटची असणार हे स्पष्ट केलं होतं. अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफघान यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले.

16 वर्षांच्या कारकिर्दीत आज अखेरचा सामना खेळणाऱ्या अफघानला दोन्ही संघांनी गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केलं. असगरचे भावनिक झालेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे चाहतेही खूप दुःखी असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, असगरच्या शेवटच्या सामन्यात टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत अफगाणिस्ताननं नामिबियावर 62 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नामिबियासमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नामिबियाचा संघ 9 बाद 98 धावाच करू शकला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

थोडक्यात बातम्या – 

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More