बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेंद्रसिंग धोनीचे ‘सुपर किंग्स’ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत; ‘या’ माजी क्रिकेटपटूचा दावा

चेन्नई | चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्येही प्रवेश करू शकणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागेल, असा अंदाज भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केला आहे. आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनीही चेन्नई सुपर किंग्स बाबत हाच अंदाज व्यक्त केला आहे. मागच्या पर्वातील कामगिरीपेक्षा यंदा त्यांची कामगिरी किंचितशी सुधारेल, असे मत आकाश चोप्राने देखील व्यक्त केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सला यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला. धोनीनं सर्वाधिक 8 वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्सकडून 7, तर पुणे सुपर जायंट्सकडून 1 वेळा फायनल खेळली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा संघ सर्वाधिक महसूल कमावणारा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सची हंगामी कमाई 761 कोटी रुपये इतकी आहे. तर त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा नंबर लागतो. चेन्नईच्या मॅचमधून बीसीसीआयला 611 कोटींचा महसूल मिळतो. तर याच यादीत 543 कोटीच्या कमाईसह कोलकाता नाईट रायडरचा तिसरा क्रमांक लागतो.

दरम्यान, फुटबॉल लीग एनएफएलमधून सर्वात जास्त कमाई होते. एनएफएलची हंगामी कमाई ही 98,300 कोटी रूपये आहे. तर प्रति सामना एनएफएलची कमाई 364 कोटी रूपये आहे. आयपीएलमधून होणाऱ्या कोट्यवधीच्या कामाईमुळेच बीसीसीआय नेहमी आयपीएल सामने खेळवण्याच्या तयारीत असते. मागील वर्षी कोरोना काळातही बीसीसीआयने आयपीएल सामने दुबईला भरवले होते.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More