बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक

पुणे | कुख्यात गुंड गजा मारणेनंतर आता पुण्यातील सगळ्यात जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर याला आज सकाळी खडक पोलिसांनी अटक केली आहे. कुडले या टोळीचे साथीदार आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामुळे बंडू आंदेकर टोळीनं एकाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे.

ओंकार कुडले याने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कित्येक दिवसांपासून आंदेकर आणि कुडले टोळीचे वाद चालू आहेत. यात कुडले टोळीचे साथीदार आंदेकर टोळीचं वर्चस्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या रागातून 21 फेब्रुवारीला गणेश पेठेतील बांबू आळीत रात्री 9च्या सुमारास आंदेकरनं कुडले टोळीतला अतुल कुडले याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आंदेकरच्या सांगण्यावरुन हा हल्ला करण्यात आला होता असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. त्यानुसार खडक पोलिसांनी त्याला मध्यरात्रीच अटक केली आहे.

आंदेकर टोळी गेल्या 25 वर्षापासून पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत आहे. मध्यंतरी प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. तुरुंगातून आल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक तक्रार नोंदवण्यासाठीही पुढे येत नव्हते.

बंडू आंदेकरवर खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणं, शस्त्र बाळगणे, अपहरण करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक आणि समर्थ या पोलीस ठाण्यात तसंच सातारा जिल्हयातील खंडाळा पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

“सुशांत गेला यात माझी काय चूक?”; भडकलेल्या अंकिताचा व्हिडीओ व्हायरल

तुमचं खातं SBI मध्ये असेल तर सावधान; अशाप्रकारे घातला जातोय गंडा!

भारताच्या ‘या’ स्टार गोलंदाजाचीही पडणार विकेट; कोण आहे लाईफ पार्टनर?

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, ‘या’ नंबरवर करा तक्रार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More