बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम

नवी दिल्ली | कोरोना लसीकरण नियमात केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यांनी लस टोचून घेऊ शकणार आहात. कारण NEGVAC ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमानुसार आता कोरोना झालेल्या रुग्णांना कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लस घेता येईल. जर कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कुणाला कोरोना झाला तर त्या व्यक्तीला कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेता येईल. कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोना लस घेता येणार आहे. आतापर्यंत प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोना लस दिली जात नव्हती. त्याबाबत फारसे स्पष्ट नियम नव्हते. पण आता NEGVAC ने ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलाही कोरोना लस घेऊ शकतता, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

कोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More