बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचं गुप्तांग कापून नेलं

भोपाळ | मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात 25 वर्षीय युवकासोबत अमानवीय घटना घडलीय. बोहल्यावर चढण्याच्या 4 दिवस आधीच अज्ञातांनी त्याचं गुप्तांग कापून नेलं.

पीडित मुलगा शौचासाठी सकाळी बाहेर पडला होता. अज्ञातांनी त्याला पकडून त्याचं गुप्तांग कापलं आणि पलायन केलं. आरोपींनी गुप्तांग सोबत नेल्यानं शस्त्रक्रिया करुन ते जोडण्याची शक्यताही मावळली आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी या मुलाचं लग्न आहे. त्यामुळे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पीडित तरुण सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, तसेच कुटुंबियांचा कुणावर संशयही नाही त्यामुळे पोलिसांचे हात अजूनही खालीच आहेत.