बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

मुंबई | जगभरात फुटबॉल खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वांचा आवडता खेळाडू आहे. अशातच रोनाल्डोने आपल्या स्वगृही परतला आहे. त्याने आपला जूना संघ मॅंचेस्टर युनायटेडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रोनाल्डो यापूर्वी युव्हेंट्स या संघाकडून खेळत होता. 12 वर्षांच्या दीर्घकालीन काळानंतर रोनाल्डो पुन्हा मॅंचेस्टर संघात दाखल झाला आहे. त्यावेळी  मॅंचेस्टर संघासोबत करार केला आहे.

काही दिवसानंतर फुटबॉलपटू मेस्सीने बार्सिलेना संघ सोडला होता. युनायटेड संघाने मंगळवारी दिलेल्या माहितीत रोनाल्डोसोबत दोन वर्षांसाठीचा करार केला आहे. हा करार पूढे वाढवला जाऊ शकतो. मॅंचेस्टर युनायटेड या संघाने रोनाल्डोसोबत तब्बल 23 मिलियन युरो म्हणजेच भारतीय रूपयांनुसार जवळपास 198 कोटी रूपये या किंमतीला करार केला आहे, असं म्हटलं आहे.

रोनाल्डो स्पॅनिश लीगमधील रिअल माद्रीद संघात 2009 साली मॅंचेस्टर संघातून गेला होता. तो या संघात 2018 साला पर्यंत या क्लबमध्ये खेळत होता. या संघासोबत खेळत असताना  2003 ते 2009 या दरम्यान आठ महत्वाचे पुरस्कारही त्याने पटकावले आहेत. या लीगमध्ये 291 सामन्यात रोनाल्डोने 118 गोल केले होते.

दरम्यान, रोनाल्डोने 2003  मध्ये युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीची सुरूवात केली होती. युनायटेड संघासोबत असताना रोनाल्डोने अप्रतिम खेळ केल्यामुळे खुप प्रसिद्धी मिळवली होती.

 

थोडक्यात बातम्या-

येत्या निवडणुकांबाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

मराठावाड्यात पावसाने पोलीस स्टेशनला बनवलं तलाव, पाहा व्हिडीओ

दरड कोसळतानाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, व्हिडीओ व्हायरल!

‘पत्नी मारते, आपटते, चावते, न्याय द्या नाहीतर…’; नवऱ्याने दिली बायकोचीच तक्रार!

“केवळ बडबड करून जनआशीर्वाद मिळत नाही, त्यासाठी कामं करावी लागतात”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More