Top News

मराठा आरक्षणासाठी आता राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामासत्र सुरु झाले आहे. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

भाऊसाहेब चिकटगावकर औरंगाबादमधील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. 

मराठा आरक्षण प्रकरणी विधीमंडळात आवाज न उठवल्याचा आरोप मराठा आमदारांवर करण्यात येतोय. त्यामुळे आता मराठा आमदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनकर्त्यांचं कौतुक; आंदोलनातही अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

-बीडमध्ये आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या