विधानभवनात पुन्हा मराठीची थट्टा, मराठी अभिमान गीतावर लिपसिंक!

मुंबई | राज्याच्या विधानभवनात मराठी भाषा दिनानिमित्त पुन्हा एकदा मराठीची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. रेकॉर्डेड मराठी अभिमान गीतावर लिपसिंक करुन हे गीत वाजवल्याचं समोर आलंय.

संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांच्या चमूकडून हे गाणं सादर केलं जात होतं. राज्याचे मंत्री तसेच आमदार विधानभवनाच्या प्रांगणात या गीतात सूर मिसळत होते. मात्र शेवटच्या कडवं सुरु असताना अचानक सीडी बंद पडल्याने हा प्रकार उजेडात आला.

कॅसेट लावून गाणे म्हणायचे होते तर लाईव्हची नौटंकी कशाला? तसाच हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सूरही आता सोशल मीडियातून उमटत आहेत. 


पाहा व्हिडिओ-