बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई। विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड करत मोठं पाऊल उचललं. शिंदेंच्या भूमिकेमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे व 35 समर्थक आमदार सध्या सुरतमधील ले मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार सुद्धा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आरोहने एकनाथ शिंदे यांचं ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं, असा सल्ला आरोह वेलणकर याने एकनाथ शिंदेंना दिला आहे. संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी, असंही आरोहने ट्विट केलं आहे.

दरम्यान, अनेक मराठी वाहिन्यांवर एकनाथ शिंदेंसोबत 12 शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार, असे देखील आरोहनं म्हटलं आहे. अगदी काही वेळातच आरोहच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. तर काहीजणांनी आरोहला ट्रोल देखील केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सुरतमधून सर्वात मोठी अपडेट समोर

“…त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो”

मतदान सुरू असताना एकनाथ शिंदेंनी प्लॅनिंग केलं?; महत्त्वाची माहिती समोर

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More